आजपासून 64 व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा

नाट्य रसिकांना 15 दिवस मेजवानी

अमरावती /13 नोव्हेंबर – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 64 वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी अमरावती येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह, डॉ. पं. दे. मेडिकल कॉलेज परिसर येथे सुरू होत आहे. यंदा प्रथमच अतिशय सुसज्ज अशा या नाट्यगृहात स्पर्धेचे नाटक सादर करता येणार असल्यामुळे स्पर्धकांमध्ये अतिशय उत्सुकता असून आनंद सुद्धा व्यक्त केल्या जात आहे. रसिक प्रेक्षकांना देखील या नाट्यगृहात अतिशय सुंदर वातावरणात नाट्यानुभव घेता येणार आहे.
14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान रोज संध्याकाळी 7 वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार असून आज सायंकाळी ठीक 7.00 वाजता किन्नर गुरु सोनाबाई गुरु मोहनाबाई यांचे हस्ते, नाट्य परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. चंद्रशेखर डोरले यांचे अध्यक्षते खाली आणि नाट्य परिषद नियामक मंडळ, मुंबई प्रशांत देशपांडे व अमरावती विद्यापीठ प्रदर्शिक कला विभाग प्रमुख, प्रा. भोजराजजी चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उदघाटण होणार आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघांचा सहभाग असून अमरावती जिल्ह्यातील संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे. या स्पर्धेत दरवर्षी अमरावती केंद्रावर अनेक दर्जेदार नाटकांचे सादरीकरण होत असते आणि प्रथम व द्वितीय क्रमांकाचे नाटकं अंतिम स्पर्धेत सहभागी होतात. या स्पर्धेकरिता तिकिटांचा दर अतिशय अल्प असून रोज 10/- आणि 15/- फक्त असणार आहे. यावर्षी सुद्धा एकंदर 16 दर्जेदार नाटकांचे सादरीकरण होणार असून या स्पर्धेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

संबंधित बातम्या

Back to top button