वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्सकडून सोनाली शिरभाते यांचा गौरव

पुण्यात पार पडला भव्य सन्मान समारंभ

* अमरावतीच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा

अमरावती /9 नोव्हेंबर – शहरातील प्रसिद्ध तणाव व्यवस्थापन तज्ज्ञ, समुपदेशक, उपचारक व मार्गदर्शक तसेच तशवळीशपीश केश्रळीीं कशरश्रळपस उशपींशी च्या संचालिका सोनाली नंदू शिरभाते यांनी नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या परिषदेत सहभागी होत लोकांना ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून आनंदी आणि संतुलित जीवन जगण्याचे रहस्य सांगितले. तणाव व्यवस्थापन, सकारात्मक विचारसरणी आणि नव्या पिढीला आनंदी बनविण्याच्या क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल इंग्लंडमधील थेीश्रव ठशलेीव ेष एुलशश्रश्रशपलश या प्रतिष्ठित संस्थेने त्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविले. 2 नोव्हेंबर रोजी पुण्यातील पत्रकार भवन येथे झालेल्या या भव्य कार्यक्रमात वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्सकडून सोनाली शिरभाते यांना प्रशस्तिपत्र व पदक प्रदान करण्यात आले. डॉ. मंजुषा टांडेकर यांनी त्यांना चरपशीळज्ञळ ॠीरपवारीींशी ढीरळपशी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सर्वोत्तम एंजल ट्रेनर म्हणून सन्मानित केले. नव्या पिढीत सकारात्मक विचार रुजविण्यासाठी सोनाली यांचे प्रयत्न सतत सुरू आहेत. सोनाली शिरभाते यांना यापूर्वीही अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. 28 जुलै 2024 रोजी हैदराबाद येथे त्यांना नारी सन्मान पुरस्कार मिळाला. तसेच 1 डिसेंबर 2024 रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात गौतम बुद्ध पुरस्कार देऊन सर्वोत्तम हीलर म्हणून गौरविण्यात आले. 18 मे 2025 रोजी खंडाळा येथेही त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सोनाली म्हणाल्या, ही उपलब्धी केवळ माझी नसून माझ्या गुरुंचे आशीर्वाद, डॉ. अशोक सोनवणे सरांचे मार्गदर्शन आणि माझ्या कुटुंबीयांचे – विशेषतः माझे पती व माझी मुलगी पर्ल – यांचे अखंड सहकार्य यांच्यामुळेच शक्य झाली. या सोहळ्यात डॉ. राजन संचेती (आयपी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन), संजय पंजवानी (उपाध्यक्ष, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स), डॉ. नागेंद्र दीक्षित, डॉ. निलीमा (महासचिव, थठए), शेखर शिंदे, डॉ. अशोक एच. सोनवणे (निदेशक, ब्रेनवे फाऊंडेशन), डॉ. सुवर्णा सुर्वे (निदेशक, आनंद सागर अध्यात्मिक उपचार संस्था), सुधाकर बी. सुर्वे (कोषाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button