अंगणवाडी सेविकांसोबत भाऊबीज उत्साहात साजरी
खा.बळवंत वानखडे यांच्याकडून बहिणींना भेटवस्तू

अंजनगाव सुर्जी/9 नोव्हेंबर : आपल्या बहीण-भावाच्या नात्याचा स्नेहबंध जपत, 9 वर्षांची अखंड परंपरा याहीवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रभा मंगलमय अंजनगाव सुर्जी येथे आयोजित या भाऊबीज सोहळ्यासाठी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील व शहरातील शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर भगिनींनी उत्स्फूर्त गर्दी केली. हा संपूर्ण सोहळा अत्यंत भावनिक आणि आनंददायी ठरला.
समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून अविरतपणे कार्य करणार्या या सर्व भगिनींच्या सन्मानार्थ, 9 वर्षांपूर्वी जिल्हा परिषद व आमदार म्हणून कार्यरत असताना व आज खासदार असतांना भाऊबीज सोहळा अविरत सुरू आहे. तेव्हापासून आजतागायत, एका भावाच्या नात्याने या सर्व भगिनींना साडीचोळी, आपुलकीचा पाहुणचार आणि सुप्रसिद्ध खंडेलवाल ज्वेलर्स तर्फे भेटवस्तू देऊन हा सण साजरा करण्याची परंपरा अखंडपणे जपत आलो आहे. या सोहळ्यात अनेक भगिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. कठीण प्रसंगी एका भावाप्रमाणे तुम्ही आमची साथ दिली, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या या प्रतिक्रिया ऐकून मनस्वी समाधान आणि आनंद मिळाला. आपल्या या बहीण-भावाच्या नात्याचा हा स्नेहबंध असाच अविरत बहरत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रदीपभाऊ देशमुख (शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी अंजनगाव सुर्जी), यांच्या सह प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती वासंतीताई मंगरोळे (माजी जि.प. सदस्या), रामेश्वरभाऊ अभ्यंकर ( ज्येष्ठ काँग्रेस नेते ), गणेशभाऊ देशमुख, अशोकभाऊ लोटिया , कलीम भाई ( महासचिव काँग्रेस कमिटी अमरावती ग्रामीण ), किस्मत भाई ( माजी नगरसेवक ), राजूभाऊ कुरेशी, आशिक अन्सारी, सलामोद्दीन भाई, अमोलभाऊ जाधव, सुधाकरभाऊ खारोडे, सुरेशदादा साबळे ( ज्येष्ठ पत्रकार), संजूभाऊ सरोदे, रमेशभाऊ सावळे ( तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग काँग्रेस कमिटी अंजनगाव सुर्जी ), प्रेमकुमार बोके ( लेखक ), तेजसभाऊ अभ्यंकर, प्रा. गजानन सरदार सर, सौ. सपनाताई शिंगणे, स्मिताताई घोगरे, सीमाताई बोके यांच्या सह खासदार बळवंतभाऊ वानखडे मित्रपरिवारातील सर्व सन्माननीय सदस्य. काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




