मिनीट्रकची प्रवासी वाहनाला धडक
टाकरखेडा संभू फाट्यावरील घटना

टाकरखेडा संभू /5 नोव्हेंबर : अमरावती परतवाडा मार्गावरील टाकरखेडा संभू फाट्यावर गतीरोधकावर एका प्रवासी वाहनाची गती मंद होताच भरधाव वेगाने मागून येणार्या एका मिनीट्रकने प्रवासी वाहनाला जबर धडक दिली. त्यामुळे सदरचे वाहन रस्त्याच्या खाली घसरले. सुदैवाने जिवितहानी टळली. ही घटना मंगळवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली.
मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास एक प्रवासी वाहन अमरावतीच्या दिशेने जात असताना टाकरखेडा फाट्यावर सदर वाहनाने गतीरोधकामुळे वाहनाची गती मंद होताच मागून भरधाव येणार्या मालवाहु मिनिट्रकने या वाहनाला जोरदार धडक दिली.त्यामुळे सदर वाहन रस्त्याच्या खाली उतरले. यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे.मात्र या प्रकरणात दोन्ही वाहनांच्या चालकांनी आपसात समजोता केल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे वलगाव ठाणेदारांनी सांगितले. मात्र या घटनेनंतर सकाळी टाकरखेडा संभू फाट्यावर चांगलीच गर्दी दिसून आली.सदर मिनीट्रक दारुचा साठा घेऊन अमरावतीच्या दिशेने जात असल्याची माहिती आहे.




