गुरुवर्य गजेंद्र ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

रक्तदान शिबिर आणि समाजकल्याण उपक्रमांतून अनुयायांचा सहभाग

अमरावती /4 नोव्हेंबर – गुरुवर्य श्री गजेंद्रजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंजनगाव सुर्जी परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमधून सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करण्याचा आणि मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.गणपती नगर येथील ब्रह्माकुमारी लोटस हाऊस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात श्री गजेंद्रभाई ठाकरे गुरुजींची रक्तगणना करण्यात आली. शेकडो अनुयायांनी उत्साहाने रक्तदान करून गुरुवर्यांच्या आदर्शांचे अनुकरण केले.या प्रसंगी बी.के. दुर्गादेवी, बी.के. शुभांगी दीदी, बी.के. ज्योती दीदी, बी.के. श्रद्धा दीदी, बी.के. रितू दीदी, बी.के. स्नेहल दीदी यांच्यासह रामभाऊ सरोदे, अनिलभाऊ अकोटकर, जगदीश गोबरे, सुमित बोरोडे, शंभूदादा मालठाणे, रवींद्रभाई राजगुरू, अक्षय ठाकरे, शुभारंभ ठाकरे, संजय ठाकरे, आकाश आढाळ, मोहन ठाकरे, धनराज भुस्कट, गौरव रिसोडकर, निवृत्ती तुरखडे, राहुल तुरखडे, समीर हावरे, सुरेश ढोले, पवन सारडा, रमण तिवारी, भूषण साटोटे, दादाराव काकड, नवीन खंडुजा, हिलाल भट, राजेश जैन, अभिनेते गुलकर, रवींद्र गायगोले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पंढरी रामदेव बाबा मंदिराचे पूज्य नरेश बाबा यांनी उपस्थित राहून गुरुवर्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या समाजसेवेच्या कार्याचे कौतुक केले. रक्तदान शिबिरासोबत वृक्षारोपण, स्वच्छता उपक्रम आणि सामाजिक जनजागृती कार्यक्रमही पार पडले. अनुयायांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण वातावरण आनंदी आणि प्रेरणादायी बनले होते.

संबंधित बातम्या

Back to top button