1 लाख 68 हजार रुपयाची वीज चोरी उघडकीस

महावितरण भरारी पथकाची कारवाई

अमरावती / 2 नोव्हेंबर – महावितरण कंपनी नेहमीच परिसरातील विज मीटर तपासणी करीत असतांना नमुना गल्ली नं.1 मधील अज्ञात महिलेच्या घराच्या मीटर मध्ये छेडछाड केल्याची निदर्शनास आले. अतिरीक्त कार्यकारी अभियंता यांच्या तक्रारीवरुन राजापेठ पोलीसांनी अज्ञात महिलेविरुध्द विज चोरी बद्दल गुन्हा दाखल करुन महावितरण कंपनीने 1 लाख 68 हजार 500 रुपयांचे नुकसान झाल्याचे नमुद केले आहे.
महावितरणच्या भरारी पथकाद्वारे रविवार रोजी नमुना गल्ली येथील शिव स्पार्ट कॉम्प्लेक्स जवळील एका महिलेच्या घरी घरगुती विद्युत मीटर लावले आहे. आज भरारी पथकाद्वारे तपासणी केली असता सदर मीटर मध्ये छेडछाड आढळून आली. त्यामध्ये मीटर वर अर्थ इंडक्शन दिसुन आले, वीज वापराची नोंद मंद गतीने होत असल्यामुळे कारणमीमांसा म्हणून मीटरची सखोली तपासणी केली असता मीटर बॅाडी सील व बॉक्स हाताळलेल आढळुन आले. न्युट्रन सीटी सेकंडरीची लाल रंगाचा वायर दरम्यान एक अवरोधक तसेच शंट डिवायडरचा निळ्या रंगाचा वायर अनधिकृतपणे जोडल्याचे आढळून आले. अश्याप्रकारे वीज ग्राहक नमुद आरोपींनी मीटर मध्ये जाणीवपूर्वक छेडछाड करुन वीज चोरी करत असल्याचे आढळले. सदर वीज चोरीमुळे कंपनीचे 8 हजार 233 युनिट चोरी झाली असून महावितरणनने दंड स्वरुपात 1 लाख 64 हजार 520 रकमेची तडजोड व 4 हजार रुपये असे एकुण 1 लाख 68 हजार 520 रुपयाचे नुकसान झाल्याची तक्रार अतिरीक्त कार्यकारी अभियंता भरारी पथकाचे श्रीकांत पंजाबराव तळेकर यांनी राजापेठ पोलीसांना लेखी स्वरुपात दिली.या तक्रारीवरुन सदर महिलेविरुध्द 627/2025 कलम 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button