माजी आ.विरेंद्र जगताप यांच्यासह 23 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

हामार्गावरील चक्काजाम आंदोलन

* तळेगाव पोलीसांची कारवाई 

अमरावती / 2 नोव्हेंबर – शेतकर्‍यांच्या दयनिय अवस्थेचा प्रश्न घेवुन धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शनिवार रोजी तळेगाव दशासर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपुर-औरंगाबाद महामार्गावर 2 तास चक्काजाम आंदोलन करुन महामार्ग बंद पाडला होता. या आंदोलनात हजारो शेतकरी महिला, युवक आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. या चक्काजाम आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांविरोधात बेकायदेशीर जमाव जमवून रहदारीच्या रस्त्यावर बसुन, वाहने अडवून जिल्हाधिकारी यांच्या आदे शाचे उल्लंघन केले असा आरोप करीत 23 काँग्रेस कार्यकर्त्यां विरोधात कलम 126 (2), 189(2), 189(3), 223 भारतीय न्याय संहीता सहकलम 135 म.पो.का. प्रमाणे कलम 339, 143, 145, 188 भां.दं.वी. कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सरकार जागे व्हा, शेतकर्‍यांना न्याय द्या , कर्जमाफी जाहीर करा अश्या घोषणा देत काँग्रेसच्या आजी, माजी पदाधिकार्‍यांनी तळेगाव दशासर येथे तिव्र आंदोलन उभारले होते. हे आंदोलन केवळ राज्यभराची सुरुवात आहे असा सुरही त्यावेळी कार्यकर्त्यांच्या मुखातुन बाहेर पडला. अश्यातच शेतकर्‍यांच्या कवडीमोल भावाला भाव द्या , विज बिलाची थकबाकी रद्द करा, खतांची दरवाढ व विमा कंपन्यांचा निष्क्रीयपणा यामुळे शेतकरी कर्जाच्या दलदलीत अडकला आहे. असे सांगत हे आंदोलन सरकार विरोधी पुकारण्यात आले होते. शेतकर्‍यांना दिलासा द्यावा कारण सरकारचे पहीले कर्तव्य आहे मात्र या सराकरने शेतकर्‍यांच्या घामाचा आणि श्रमाचा आणि जीवनाचा अवमान केला आहे, असा आरोप करीत पदाधिकार्‍यांनी हे आंदोलन उग्र स्वरुपात केले. हे आंदोलन माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात संपन्न झाले होते. एकीकडे शेतकर्‍यांच्या हितासाठी हे आंदोलन करण्यात आले असले तरी यामध्ये बेकायदेशीर जमाव जमवुन रहदारीच्या रस्त्यावर बसुन वाहने अडवून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचा ठपका ठेवत पोलीसांनी माजी आमदार विरेंद्र जगताप, पंकज वानखडे, श्रीकांत गावंडे, दिपक भगत, अनिता राजु मेश्राम, नितीन गोंडाणे, आबेद अहमद खान, रविंद्र राऊत, सुरेष रामगुंडे, विजय हाडकर, शरद अवचार, अनिल जिवतोडे, मुकींदा कासार, पुरुषोत्तम उखाडे, प्रशांत हुडे, सतिश देशमुख, राजेश बनसोड, राजु लांजेवार, राजेश राजनेकर, हरीभाऊ नवरंगे, विवेक चौधरी, प्रमोद मेश्राम, प्रमोद पनपालीया यांच्यासह आदी कार्यकर्त्यांवर प्रतिबंधक कारवाई करुन गुन्हे दाखल केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button