अज्ञात महिलेकडून 6 लाख रुपयांच्या सोन्यावर हात साफ

चांदुर बाजार-अमरावती बसमधील घटना

अमरावती / 2 नोव्हेंबर – दिवाळीचे लगभग संपल्यानंतर शहरासह ग्रामिण भागातील नागरीक आपआपल्या कामानिमित्य प्रवास करीत असतात. अश्या प्रवासातच चोरटे मुद्देमालावर हात मारीत असतात. अश्यातच आज रविवार रोजी चांदुर बाजार-अमरावती बसमध्ये एक महिला आपल्या पतीसह प्रवास करीत होती. अश्या प्रवाश्यात अज्ञात महिलेने पर्स ची चैन उघडून जवळपास 6 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघड झाली. सदर महिला फिर्यादीच्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलीसांनी अज्ञात महिला आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
चांदुर बाजार वरुन फिर्यादी महिला व त्यांचा पती अमरावतीकडे येत होते. सदर फिर्यादी ही महिला आपल्या मुलीकडे जात असल्याचे तक्रारीत नमुद आहे. फिर्यादी महिला बसमधे प्रवास करित असतांना बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने आजुबाजुला असलेल्या महिला अनोळखी होत्या व त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या महिला या बसमधुन पंचवटी येथे उतरत असतांना अचानक फिर्यादीला फोन आला त्या फोनमध्ये गुंतल्या असल्याचे पाहुन एका अज्ञात महिलेने फिर्यादी महिलेची पर्स उघडून पर्समधिल लहान पर्स चोरी केली. त्यामध्ये 64 ग्रॅमचे सोने, सोन्याची पट्टी पोथ 40 ग्रॅम, मंगळसुत्र 20 ग्रॅम, अंगठी 1 ग्रॅम, सोन्याचे धम्मचक्र 1 ग्रॅम, कानातले 2 ग्रॅम असा एकुण 64 ग्रॅम किमतीचा अंदाजित 6 लाख 40 हजार रुपये असा मुद्देमाल बसमधिल कोणीतरी अज्ञात महिलेने चोरुन नेल्याची जबानी तक्रार वरुन सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई गाडगे नगर पोलीस करीत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button