17 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पराग नगरमधील भटवाडी परिसरातील घटना

अमरावती /29 ऑक्टोबर – स्थानिक राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पराग नगर परिसरातील भटवाडी येथील रहिवासी नील संतोष राऊत या 17 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. तक्रार मिळताच राजापेठ पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करुन तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार दाखल केलेल्या तक्रारीनुसार, नील राऊतचे पालक 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास काही कामा साठी बाहेर गेले होते आणि संध्याकाळी 6 च्या सुमारास घरी परतले. दरम्यान, स काळी 10:30 च्या सुमारास शिकवणी वर्गासाठी निघालेला नील राऊत दुपारी 12 च्या सुमारास घरी परतला. तो नेहमीच घराची चावी घेऊन जात असे. त्या संध्याकाळी नीलचे पालक परत आले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी बराच वेळ त्यांना हाक मारली, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नीलचे वडील संतोष




