धीरज नंदवंशीवर प्राणघातक हल्ला

पेन्शनपुरा परिसरातील घटना

परतवाडा /29 ऑक्टोबर : पेंशनपुरा येथील संकटमोचन हनुमान मंदिर परिसरातील धीरज नंदवंशी यांच्यावर अज्ञात व्यक्तिंनी चाकुने सपासप वार करुन प्राणघातक हल्ला केला. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाला.
प्राप्त माहितीनुसार धीरजचा त्याच्या मित्राशी जुन्या घटनेवरून वाद सुरु होता.यावरून बुधवारी रात्री धीरज आपली दुचाकी घेवुन बाहेर गेला असतांना अज्ञात मारेकर्‍यांनी त्याच्या डोक्यावर धारदार चाकुने सपासप वार केले. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. घटनेनंतर मारेकरी पसार झाले. घटनेची माहिती समजताच धीरजचे वडीलांनी पोलीसांना माहिती दिली. परिसरातील नागरीक व धीरजच्या कुटुंबियांनी त्यास रुग्णवाहिकेतुन उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने धीरजला अमरावती येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती पोलीसांना समजताच त्यांनी घटनास्थळाची पहाणी करुन वडील व इतरांचे बयाण नोंदविले.पोलीसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवला असून फरार आरोपीचा शोध घेत आहे. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. बातमीची माहिती वार्‍यासारखी शहरात पसरताच नागरीकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती. आरोपीला पोलीसांनी त्वरीत अटक करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी धीरजच्या कुटुंबियांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button