भावाला मॅसेज पाठवुन युवकाची आत्महत्या

समर्थ कॉलनी परिसरातील घटना

अमरावती/29 ऑक्टोबर खताच्या कंपनीत काम करणार्‍या 36 वर्षीय व्यक्तीने त्याच्या भावाला संदेश पाठवुन आत्महत्या केली. जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा मॅसेज आपल्या भावाला पाठविला. सदर मॅसेज येताच भाऊ आणि इतर नातेवाईक ताबडतोब त्याच्या शोधात कंपनीच्या आवारात गेले, परंतु त्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवार, 27 ऑक्टोबर रोजी घडली. मृत व्यक्तीचे नाव चंद्रकांत जगन्नाथ अडर्र्क (36) असे आहे, तो स्वामी समर्थ मंदिर परिसरातील रहिवासी आहे. चंद्रकांत अडर्र्क हा नांदगाव पेठेतील एका खत कंपनीत काम करत होता. सोमवारी दुपारी 1:30 च्या सुमारास चंद्रकांतने त्याचा भाऊ शशिकांतला संदेश पाठवून तो जीवनाला कंटाळून आत्महत्या करत आहे. संदेश पाहिल्यानंतर शशिकांतने त्याचा चुलत भाऊ शैलेंद्र अर्डक याला कळवले. शशिकांत, शैलेंद्र आणि इतर नातेवाईकांनी तात्काळ नांदगाव पेठेतील चंद्रकांतच्या कंपनीच्या आवारात धाव घेतली. त्यांनी त्याचा शोध सुरू केला. त्याच आवारातील एका बंद हॉटेलच्या बाथरूमजवळील कडुलिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत चंद्रकांत आढळला. त्याला ताबडतोब खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शैलेंद्र अर्डक यांनी नांदगाव पेठेतील पोलिसांना माहिती दिली. या आधारे पोलिसांनी अपघाती मृत्यू ची नोंद केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button