एनएसयूआय कडून फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येचा निषेध
मुख्यमंत्री फडणविस यांच्या राजीनाम्याची मागणी

अमरावती/ 28 ऑक्टोबर – काँग्रेस संलग्न संघटना एनएसयूआयच्या नेतृत्वात सोमवारी उशीरा रात्री आंदोलन करून सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येच्या घटनेचा निषेध करण्यात आला. या आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की, राज्यातील महत्वाचे गृहखाते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असूनही ते इतर राज्यांतील निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. गृहविभागातील एका पोलीस कर्मचार्याच्या प्रताडनेमुळे महिला डॉक्टरने आत्महत्या केली, ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे संकेत कुलट, जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे, स्वराज कोठे, प्रथमेश गावंडे, वेदांत साखरे, कौस्तुभ सावरकर, जयेश सागळे, प्रज्वल सुने, अभिषेक भोसले, प्रथमेश खर्चे, पार्थ म्हैसूने, सूरज खैरे, मयूर गोटखडे, यज्ञेश खंडारकर, जय ठाकरे, साहिल वनारे, क्रिश भिसणे, दीपेश कुरुंबन्सी, निशांत पवार, मोहम्मद जमे, आदित्य उंबरकर, स्वराज कालबांडे, ओम पाथ्रीकर, ओम पालेश, ओमलेश पालेकर, उत्कर्ष मुधाळकर, रोहित चतुर्वेदी आदी उपस्थित होते.




