अमरावतीत ई-बस डेपो व चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी शासनाची मंजुरी

आ. रवी राणा यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांचे कडे केलेल्या प्रयत्नांना यश

* महसूल व वन विभाग मंत्रालयाने शासन आदेश जारी

अमरावती/27 ऑक्टोबर – केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई. बस योजनेअंतर्गत ई-बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनसाठी मौजा बडनेरा, सर्व्हे क्र. 110 मधील 2.38 हे.आर. शासकीय जागा, महानगरपालिका अमरावती यांना मूल्यरहित पद्धतीने 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्याबाबत आज शासन निर्णय घेण्यात आला आहे. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अमरावती यांच्याकडे सातत्याने या विषयासाठी पाठपुरावा केला होता आणि आज त्यांना यश मिळाले. महसूल व वन विभागाने या संदर्भात शासन निर्णय काढला. मौजा बडनेरा, ता.र्ज. अमरावती येथील सर्व्हे क्र. 110 मधील 2.38 हे.आर. शासकीय जमीन ई-बस डेपो व चार्जिंग स्टेशनसाठी पी.एम.ई. बस योजनेअंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल सांघटा, 1966 चे कलम 38 आणि 40 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची वापर नियम), 1971 चे नियम 5 व 35 मधील तरतुदींनुसार प्रचलित अटी व शर्तींच्या अधीन राहून 30 वर्षांसाठी विनामूल्य भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता दिली आहे. आमदार रवी राणा यांचे अमरावती शहर आणि बडनेरा शहरातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त करून अभिनंदन केले, तर शासकीय अधिकार्‍यांमध्येही आनंद व्यक्त केला गेला.

संबंधित बातम्या

Back to top button