महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी
47 अधिकार्यांना बढत्या

* महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दिवाळी भेट
अमरावती /20 ऑक्टोबर : आज राज्याच्या महसूल विभागातील 47 अधिकार्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्राला नवे 47 अपर जिल्हाधिकारी मिळालेत. गेल्या काही वर्षांपासून अधिकार्यांच्या बढत्या रखडल्या होत्या. ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून आज शासन आदेश जारी करण्यात आलाय. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल अधिकार्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट दिलीय. आज मंत्रालयातील दालनात जाऊन बावनकुळे यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील महसूल अधिकार्यांशी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यानंतर बढत्यांची घोषणा केली. महसूल विभाग जनतेच्या आशा, आकांक्षांना मूर्तरूप देणारा विभाग आहे. हा विभाग अधिकाधिकपणे जनताभिमुख व्हावा, पारदर्शी रहावा, यासाठी सगळे मिळून प्रयत्न करू, असे बावनकुळे यावेळी म्हणाले. सर्वसामान्य जनतेशी थेट संबंध येणार्या मोजक्या शासकीय विभागांपैकी एक विभाग असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान, अधिकार्यांच्या पद पात्रता तपासून त्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. तसेच पदोन्नत झालेले अधिकारी जर 30 दिवसांच्या आत रूजू न झाले नाहीत, तर त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंग कारवाई केली जाणार आहे.




