दर्यापूर मध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ

धनतेरसच्या मुहुर्तावर कापसाला 7501 रु. प्रति क्विंटल दर

दर्यापूर /19 ऑक्टोबर – स्थानिक मंगलबाबा अ‍ॅन्ड रामदेव बाबा जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये रविवारी धनतेरसच्या शुभ मुहूर्तावर कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसाला प्रति क्विंटल 7,501 रुपयांचा दर देण्यात आला. या कार्यक्रमाला जिनिंगचे संचालक मन्नू आग्रवाल, अशोक आग्रवाल यांच्यासह मान्यवर आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते काटा पूजनाने झाली. त्यानंतर कापूस आणलेल्या शेतकऱ्यांचा शाल, टोपरी व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे, मंगलबाबा अ‍ॅन्ड रामदेव बाबा जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीत 2008 पासून तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केली जाते. शेतकऱ्यांना दरवर्षी चांगल्या दरात कापसाचा भाव देण्यात येतो, त्यामुळे या जिनिंगने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी आपला माल विक्रीसाठी या जिनिंगला प्राधान्य देतात.

धनतेरसच्या शुभ मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात झाल्याने तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे. संचालकांनी शेतकऱ्यांना आपला कापूस विक्रीसाठी मंगलबाबा अ‍ॅन्ड रामदेव बाबा जिनिंगमध्ये आणण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button