विकृत पुत्राने जन्मदात्या पित्याची केली हत्या
तालुक्यातील अमडापूर शेतशिवारातील घटना

वरुड । 14 ऑक्टोबर – तालुक्यातील अमडापूर येथील शेत शिवारात आज (ता. 16) सकाळच्या सुरुवातीला एका धक्कादायक घटनेत विकृती मुलाने आपल्या वयस्कर बापाची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपी मुलाला पोलीस ताब्यात घेतले आहे. अमडापूर येथील रहिवासी प्रल्हाद गंगाराम साबळे (वय 85) हे भाजीपाला उत्पादन करत होते. आज सकाळी राजरूपा बाजारात आठवडी बाजार असल्याने त्यांनी शेतातील भाजी विकण्यासाठी बाजारात नेली होती. परंतु काही वेळातच प्रल्हाद यांचा मृत्यू झाल्याची माहिती गावात पसरली.
घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले असता, प्रल्हाद यांचे मृतदेह त्यांच्या शेतात आढळले. आरोपी मुलगा यागेश (वय 36) त्यावेळी घटनास्थळी उपस्थित नव्हता. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आणि तत्काळ घटनास्थळी पोलीस पोहोचले. तपासात कळले की हा मुलगा विकृती असून, या घटनेमुळे अमडापुरसह परिसरातील गावांमध्ये मोठी खळबळ उडाली.
या प्रकरणी मृतक प्रल्हाद साबळे यांच्या मुली प्रल्हाद साबळे (वय 50) यांच्या तक्रारीवरून पोलीस यागेश याच्यावर कलम 103(1) B.N.S. अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास जिल्हा पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अर्जुन ठासे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत विखे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सरुशे काबळे, श्रीराम बदने आणि दिवाकर वाघमारे करत आहेत.




