शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळांसह प्रत्येक ठिकाणी होणार जागतिक योग

श्री ह.व्या.प्र मंडळाच्या डिग्री कॉलेज तर्फे 21 दिवसीय निःशुल्क योग प्रशिक्षण

अमरावती /30 मे: श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे भारतीय ज्ञान परंपरा केंद्र व डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून सर्वांसाठी 21 दिवसीय निःशुल्क योग अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. सदर अभ्यासक्रमाचे प्रात्याक्षिक अमरावती जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक स्थळे, प्रेक्षणीय स्थळे जसे माता अंबादेवी मंदिर, एकविरा देवी मंदिर, कोंडेश्वर मंदिर, गजाननधाम मंदिर, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मुख्य इमारत, श्रीकृष्ण मंदिर,शिव टेकडी, स्वामी समर्थ मंदिर, इत्यादी ठिकाणी होणार असून त्याचे थेट प्रेक्षेपण डिपार्टमेंट ऑफ योग डीसीपी,ई एचव्हीपीएम च्या युट्यूब चॅनेल वर होईल.
21 जुन 2015 पासून संपूर्ण विश्वामध्ये जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्या निमित्य योग चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. 21 जून ला संपूर्ण जगभरात मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान, आयुष मंत्रालय, नवी दिल्ली द्वारा प्रकाशित सामान्य योग अभ्याक्रमचा अभ्यास केला जातो. श्री ह.व्या.प्र मंडळाच्या भारतीय ज्ञान परंपरा केंद्र व डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती यांनी सर्व योग साधक, विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व सामान्यां करीता 1 जून ते 21 जून 2025 पर्यंत सामान्य योग अभ्याक्रम प्रशिक्षण कोर्स चे निःशुल्क आयोजन केले आहे. सदर अभ्यासक्रम दररोज सकाळी 6.30 ते 7.30 पर्यंत आभासी (ऑनलाईन) पद्धतीने होईल.
मागील 4 वर्षा पासून भारतीय ज्ञान परंपरा केंद्र व डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती द्वारा 8 हजार पेक्षा जास्त योग साधकांनी योग चे निःशुल्क प्रशिक्षण घेतले आहे अशी माहिती मंडळाच्या सचिव व आईकेएस च्या मुख्य समन्वयिका डॉ माधुरीताई चेंडके यांनी दिली आहे. सदर ट्रेनिंग कोर्स मध्ये जास्तीत जास्त व्यक्तीने सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाचे कोषाध्यक्ष व डीसीपीइ चे प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे यांनी केले आहे. सदर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सहभागीनाऑनलाईन सर्टिफिकेट देण्यात येईल. सदर निःशुल्क अभ्याक्रमाला प्रवेश घेण्यासाठी 8275753648 या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करावा किंवा योगशास्त्र विभाग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती ला भेट द्यावी असे आवाहन योगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनील लाबडे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button