रहाटगावमध्ये बनावट चलनी नोटांचा गोरखधंदा उघड

नांदगाव पेठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

* तीन आरोपींना अटक, एक फरार

नांदगाव पेठ/ 15 ऑक्टोंबर – रहाटगाव परिसरात काही इसम दैनंदिन व्यवहारात बनावट चलनी नोटा वापरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी मध्यरात्री धडाकेबाज कारवाई करून तिघा संशयितांना रंगेहात पकडले. या कारवाईत तब्बल 26,500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून आणखी एक आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे. या घटनेने अमरावती जिल्ह्यात मोठा खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांना रहाटगाव परिसरात बनावट नोटांचा वापर होत असल्याची गुप्त माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पोलीस पथकासह उपलब्ध पंचांना घेऊन शासकीय वाहनाने घटनास्थळी रवाना केले. रहाटगाव येथील वृंदावन कॉलनी परिसरात गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार काही इसम अंधाराचा फायदा घेत रस्त्यावर बसलेले दिसले. पोलिसांनी शासकीय वाहन थांबवून सापळा रचला आणि तीन संशयितांना जागीच पकडले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना चौथ्या व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेतले.

पकडलेल्या संशयितांची नावे सिंचित अरविंद चव्हाण (वय 19, रा. रहाटगाव प्लॉट), दीपक बाबलू खडंर (वय 32, रा. पचन शिल नगर, रहाटगाव) आणि सघं रत्न राजद्रें माटेघर (वय 36, रा. जनु वस्ती, मस्जिदजवळ, रहाटगाव) अशी आहेत. सिंचित चव्हाणकडे 13,000 रुपये (26 नोटा × 500 रुपये), दीपक खडंरकडे 7,500 रुपये (15 नोटा) आणि सघं रत्न माटेघरकडे 6,000 रुपये (12 नोटा) मिळून एकूण 26,500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या गेल्या. बारकाईने तपासात या नोटांवर आरबीआयचा लागेस, वॉटरमार्क नसल्याचे आणि पाण्यावर रंग निघत असल्याचे आढळले, ज्यावरून नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

सिंचित चव्हाणने सांगितले की, या नोटा आदित्य किशारे रामकेर (वय 25, रा. समथर्वाडी, रहाटगाव) याने बाजारात वापरण्यासाठी दिल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणात चारही संशयितांविरुद्ध भारतीय दंडसंहिता 2023 अंतर्गत कलम 179 आणि 180 नुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या कारवाईमुळे रहाटगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये पोलिस दलाच्या तत्परतेबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button