तृप्ती वाठ भाजप बडनेरा मंडळाच्या महिला अध्यक्षा

नवीन कार्यकारिणी समिती स्थापन

* महिला शहराध्यक्षा सुधा तिवारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

अमरावती / 15 ऑक्टोंबर – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष तृप्ती सचिन वाठ यांची भाजप बडनेरा मंडळाच्या महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, यासोबतच बडनेरा मंडळासाठी महिला कार्यकारिणी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात बडनेरा मंडळाच्या नवनियुक्त महिला अध्यक्षा तृप्ती वाठ आणि नव्याने स्थापन झालेल्या कार्यकारी समितीत समाविष्ट असलेल्या महिला पदाधिकार्‍यांना भाजपच्या महिला शहराध्यक्षा सुधा तिवारी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी भाजप शहर महिला अध्यक्षा सुधा तिवारी यांनी सर्व नवनियुक्त महिला पदाधिकार्‍यांचे त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रभावीपणे कसे कार्य करावे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी ‘व्होकल फॉर लोकल’ मोहिमेची माहितीही दिली. भाजप शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या नियुक्तीपत्र वितरण समारंभाला बडनेरा मंडळ अध्यक्ष उमेश निलगिरी, मंडळ सरचिटणीस नरेश धामई यांच्यासह भाजप महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button