कर्जाच्या विवंचनेत युवा शेतकर्‍याची आत्महत्या

धनोडी येथील घटना

शेंदुरजनाघाट । 15 ऑक्टोबर -पोलिस स्टेशन हद्दीतील धनोडी येथे 38 वर्षीय विवाहित ईसमाने कर्जाच्या विवंचनेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनोडी येथील राजु वामन गाडगे (38) हे एम.एस.ई.बी. वरुड येथे खाजगी पद्धतीने नोकरी करत होते. त्यांच्यावर फ्लिपकार्ट, एस.बी.आय, एच.डी.एफ.सी आणि बचत गटाचे कर्ज असल्याने कर्जाच्या विवंचनेत त्यांनी आपल्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीतील पंख्याला ओढणीचा फास घेऊन आत्महत्या केली. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 8.45 वाजता त्यांची पत्नी वर गेल्यावर त्यांनी ओढणीच्या फासाने लटकलेले दिसल्याने तिने आरडाओरडा केला. घरातील सदस्य वरच्या मजल्यावर धावून गेले असता त्यांनी ओढणीचा फास कापून त्यांना खाली उतरवले, मात्र तेव्हाच ते मरण पावल्याचे लक्षात आले. शेंदुरजनाघाट पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, वरुड येथे पाठवला. पुढील तपास दिपक महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन महाजन आणि मदन उईके करीत आहेत. मृतकाच्या मागे पत्नी, दोन मुली, आई आणि भाऊ असा परिवार असून त्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button