चाकूच्या धाकावर दहशत पसरविणार्या दोघांना अटक
गुन्हे शाखा पथकाची कारवाई

अमरावती /9 ऑक्टोबर : गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना आदेशाचे उल्लंघन करून शहरात फिरणाऱ्या दोन फरार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन चाकू जप्त करण्यात आले आहेत. प्राप्त माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक फ्रेझरपुरा पोलिस स्टेशन परिसरात गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारावर फरार आरोपी शक्ती प्रवीण वाघमारे (30) हा लायब्ररी चौकात चाकू घेऊन देहशत पसरवीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून चाकू जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध फ्रेझरपुरा पोलिस ठाण्यात शस्त्रास्त्र कायदा आणि इतर महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, चिचफैल येथील रहिवासी सागर रामदुलार यादव (38) याला कस्तुरबा कन्या शाळेच्या पुलाजवळ अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून चाकू जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




