पंचायत समितीस्तरावर सोमवारी आरक्षण सोडत

अमरावती /9 ऑक्टोबर : राज्य निवडणूक आयोगाने पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीकरीता सदस्यांचे आरक्षण निश्चित करण्याबाबत कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता भातकुली पंचायत समितीसाठी तहसिल कार्यालय, भातकुली जैन येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम, 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्व साधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्यासाठी सोडत पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी विशेष सभा आयोजित केली आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button