नांदगाव खंडेेशर तालुका ओला दुष्काळ घोषित करा

शिवसेनेची तहसील व कृषी कार्यालयावर धडक

नांदगाव खंडेेशर/8 ऑक्टोबर – नांदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेने तहसील व कृषी कार्यालयात धडक देऊन तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात घेराव करून मागण्यांचे निवेदन सादर केले. तालुक्यात सततचा मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सरकार नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असून ते मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे नांदगाव तालुका ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी, सरसकट पीक विमा देण्यात यावा आणि सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन सादर करून यावेळी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

या वेळी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर, उपजिल्हाप्रमुख ओंकार ठाकरे, तालुकाप्रमुख प्रमोद कोहळे, बाळासाहेब राणे, डॉ. प्रमोद कठाळे, डॉ. अरुण बेलसरे, प्रमोद ठाकरे, भूषण दुधे, निलेश ईखर, शरद बोदडे, सुनिल गुरमुळे, गुणवंत चंदूरकर, रवि ठाकूर, वासुदेव लोखंडे, सुरज सोळंके, भागवत लाहे, अक्षय राणे, अनिल पवार, भास्कर काळे, संजय गायगोले, आशीष भाकरे, दत्ता ससंकरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button