सिजेआय भुषण गवई यांच्यावरील हल्याचा प्रयत्न निषेधार्ह

आ. सुलभाताई खोडके यांची प्रतिक्रिया

अमरावती /6 ऑक्टोबर : आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान देशाचे सरन्यायाधीश भूषणजी आर. गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. एका माथेफिरू वकिलाने सुनावणीदरम्यान मंचाजवळ जाऊन सरन्यायाधीश भूषणजी आर. गवई यांच्यावर बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळीच सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्याला अडवले. भारतीय राज्यघटनेतील संवैधानिक पदावर झालेला हा विकृत मानसिक हल्ला निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया आ. सौ. सुलभा ताई खोडके यांनी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू असतानाही सीजेआय गवई शांत राहिले आणि वकिलांना युक्तिवाद सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. मात्र, माथेफिरूने आरडा-ओरड करून देशाच्या संवैधानिक पदाचा अवमान केला. न्यायमूर्ती भूषणजी गवई हे फक्त अमरावतीचे सुपुत्र नसून, देशाचे सरन्यायाधीश आहेत; त्यामुळे त्यांच्या पदाची गरिमा व सन्मान राखला जाणे आवश्यक आहे. आज न्यायालयात घडलेल्या हल्ल्याचा निषेध करावा आणि याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

Back to top button