13 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार
बडनेरा पोलिसात गुन्हा दाखल

बडनेरा /6 ऑक्टोबर : बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील भानखेडा जवळील हनुमान गढीच्या झुडपात एका तरुणाने 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी वेदांत अरुण राऊत (19, महालक्ष्मी नगर) याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता तिची 13 वर्षीय मुलगी शाळेत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली आणि नेहमीच्या वेळेनुसार सायंकाळी 5.30 वाजता परत आली. घरी परतल्यानंतर तिला पोटात तीव्र वेदना जाणवली. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली, मात्र मुलीच्या शिक्षिकेने घरी फोन करून सांगितले की ती आदल्या दिवशी शाळेत गेली नव्हती. परिणामी, तक्रारदार महिलेने कुटुंबाकडे तक्रार दाखल केली. चौकशीमध्ये उघड झाले की, 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता वेदांत राऊत मुलीला आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने आपल्या दुचाकीवरून प्रथम कोंडेेशर मंदिराजवळील तलाव आणि नंतर हनुमान गढी जवळील झुडुपात घेऊन गेला आणि तिला जबरदस्तीने अत्याचार केले. या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी वेदांत राऊतविरुद्ध बीएनएसच्या कलम 65(1) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 4, 6 आणि 9(एन) अंतर्गत फौजदारी गुन्हा




