सरन्यायाधीश यांच्यावर हल्ला म्हणजेच लोकशाहीच्या मुलभूत मुल्यांवर हल्ला

विशेष तपासणी दरम्यान बाब उघडकीस

* दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल, चौकशी सुरू

अमरावती /6 ऑक्टोबर : अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या उच्च सुरक्षा विभागातील अंडा कक्षात ठेवलेल्या दोन दोषी कैद्यांकडून दोन मोबाईल हँडसेट आणि दोन मोबाईल बॅटरी जप्त करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कारागृहाच्या कडक सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणात कैदी क्रमांक सी-6484 दरवेश खान आणि कैदी क्रमांक सी-6420 दस्तगीर गफूर शाह सद्दा (दोघेही रहिवासी अमरावती) यांच्याविरुद्ध फ्रेझरपुरा पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, तुरुंग अधिकारी देवराव जाधव यांच्या आदेशानुसार पोलिस अंमलदार अनिश गजानन हरणे आणि बारा तुरुंग पोलिस कर्मचारी यांनी अंडा सेलमध्ये राहणाऱ्या कैद्यांची विशेष झडती घेतली. झडतीदरम्यान दोन कैद्यांकडून लावा कंपनीचा कीपॅड मोबाईल फोन आणि नोकिया कंपनीचा कीपॅड मोबाईल फोन जप्त करण्यात आला. तसेच, अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या अमरावती मध्यवर्ती कारागृहात कैद्याजवळून एक अॅपल मोबाईल फोन, एक अँड्रॉइड फोन आणि दोन मोबाईल बॅटऱ्या देखील सापडल्या.

या घटनेमुळे तुरुंग प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी स्पष्ट झाल्या असून, कारागृहात मोबाईलसारख्या वस्तू आत कशा पोहोचल्या याबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहे. फ्रेझरपुरा पोलिसांनी तक्रारीच्या आधारे दोन्ही आरोपी कैद्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 188 अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button