मंत्री डॉ.उदय सामंत आज अमरावती दौर्यावर

अमरावती /5 ऑक्टोबर : उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा आज सोमवार, 6 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा दौर्यावर आहे. दौर्यानुसार, दुपारी 3.30 वाजता त्यांचे अमरावती विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता ’अभिजात मराठी भाषा सप्ताह’ निमित्त आयोजित भारतीय अभिजात भाषा परिषदेस त्यांची उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर सायंकाळी 5.30 वाजता अमरावती विमानतळावरून नागपूरकडे प्रयाण करतील.




