युवा स्वाभिमानमध्ये शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रवेश

आ.रवि राणा यांच्याहस्ते स्वागत

अमरावती /4 ऑक्टोबर : युवा स्वाभिमान पार्टी ही गेल्या 18 वर्षांपासून आपल्या सामाजिक उपक्रमांद्वारे आणि संस्थापक अध्यक्ष आ. रवि राणा यांच्या सामाजिक कार्यामुळे तसेच कार्यकर्त्यांशी असलेल्या आपुलकीच्या वागणुकीमुळे विविध पक्ष आणि संघटनांमधून हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते प्रवेश घेत आहेत. त्या अनुषंगाने गेली 20 वर्षे क्रांती ज्योती ब्रिगेडच्या माध्यमातून समाजहितासाठी झटणारे परंतु राजकीय सहकार्य व योग्य नेता न मिळाल्यामुळे समाजाला हवा तसा न्याय न मिळवून देऊ न शकलेले अँड. नंदेश अंबाडकर यांनी आता आ. रवि राणा यांच्या रूपाने समाजहितासाठी कार्य करणारा नेता मिळाल्यामुळे युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. बडनेरा येथे संपन्न झालेल्या भव्य जाहीर प्रवेश सोहळ्यात त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी आ. रवि राणा यांनी प्रत्येक प्रवेश घेणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांचे स्वागत केले. अँड. नंदेश अंबाडकर यांनी सांगितले की, 10 टक्के राजकारण व 90 टक्के समाजकारण करणाऱ्या आ. रवि राणा यांच्यासोबत काम करणे हे आपले भाग्य असून सर्व कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून समाजहितासाठी काम करतील. आ. रवि राणा यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करत ते गेल्या 20 वर्षांपासून समाजासाठी झटणारे प्रामाणिक व्यक्तिमत्व असल्याचे म्हटले. या कार्यक्रमात महेंद्र भातकुले, रामदास मसने, ओंमप्रकाश अंबाडकर, प्रा. सुरेश यावले, राजा खवले, प्रभाकर वानखडे, दिपक मेहरे, चंद्रशेखर कविटकर, पंजाबराव फरकाडे, माधुरी भुयार, राजेश भुयार, ईश्वर सावरकर, अनुप कविटकर, इंजि. रविंद्र चौधरी, वंदना दहिकर, मनोहर इंगळे, मधुकर भुयार, निळकंठराव यावलकर, अशोक देवते, विनय चौधरी, डॉ. विष्णनाथ कविटकर, दिनेश खेरडे, प्रदिप कांडलकर, सुनिल राऊत, प्रशांत वर्‍हेकर, अविनाश मेहरे, प्रदिप धाडसे यांच्यासह शेकडो क्रांती ब्रिगेडचे पदाधिकारी व सदस्यांनी प्रवेश घेतला. या वेळी राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे, मार्गदर्शक सुनिल राणा, कोषाध्यक्ष शैलेन्द्र कस्तुरे, सचिव जयंतराव वानखडे, कमलकिशोर मालानी, प्रा. अजय गाडे, हरीष चरपे, प्रवक्ते नाना आमले, महिला जिल्हाध्यक्षा सोनाली नवले, माजी नगरसेविका सुमती ढोके, समाधान वानखडे, विनोद येवतीकर, अजय जयस्वाल, विलास वाडेकर, विजया घोडेस्वार, सिध्दार्थ बनसोड, रऊफ पटेल, मकसुदभाई, महल्ले काका, आशिष कावरे, अमोल मिलके, दीपक तीखे, कीरण घवले, सुधिर लवणकर, अजय बोबडे, शुभम उंबरकर, राहुल काळे, रवि वानखडे, निकेश सोनोने, वर्षा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button