महानगरपालिकेच्या कर वसुली शिबीरात 22 लाख जमा
रविवारी झोननिहाय मालमत्ता कर वसुली शिबीर उत्साहात

* नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
अमरावती /5 ऑक्टोबर : महानगरपालिका पाचही झोन अंतर्गत करदात्यांसाठी आयोजित भव्य मालमत्ता कर वसुली शिबिराचा दुसरा दिवस 5 ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला. नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे रविवारी तब्बल 22 लाखांची कर वसुली करण्यात आली. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कर भरला तसेच त्यांच्या विविध शंकांचे निरसन तज्ज्ञांकडून करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातील नागरी सुविधा आणि विकासासाठी वेळेत कर भरण्याची बांधिलकी व्यक्त केली. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, मालमत्ता धारकांच्या सोयीसाठी अशा प्रकारची शिबिरे पुढेही आयोजित करण्यात येणार आहेत. वेळेत कर भरणाऱ्या नागरिकांमुळे शहर विकासाची गती अधिक वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. या शिबिरामुळे कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक झाली असून महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी नागरिकांना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करत आहेत.




