दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने झाली राणा प्रताप महाराजांची जयंती

दर्यापूर /28 मे-दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महान योद्धा, स्वाभिमानाचे प्रतीक आणि अपार शौर्याच्या प्रतीक महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन तथा पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी बाजार समितीचे उपसभापती श्रीकृष्ण पाटील कराळे, संचालक प्रभाकर पाटील तराळ, संचालक भारत भाऊ आठवले, संचालक राजेश शेठ राठी, सचिव हिम्मतराव मातकर आणि श्री. साहेबराव जामणिक, अजय भाऊ देशमुख , सुधीर भाऊ रहाटे उपस्थित होते. या कार्यक्रमातून राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि संघर्षमय इतिहासाचे स्मरण करत तरुण पिढीला प्रेरणा मिळावी हा उद्देश होता. महाराणा प्रताप यांचे पराक्रम आणि त्याग हे आजही आपल्या जीवनात आदर्शवत असल्याचे मनोगत सुनील पाटील गावंडे यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या

Back to top button