एका भावाने दुसर्यास कुर्हाडीने केले जखमी

वरुड/दि.3 – क्षुल्लक कारणावरून एका भावाने दुसऱ्याला कुर्हाडीने जखमी केल्याची घटना भापकी येथे घडली. यातील फिर्यादी आणि आरोपी हे सख्खे भाऊ असून एकाच घरात राहतात. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी साडे दोन वाजता फिर्यादी निलेश भोयर हे मजुरीचे काम करून घरी परत आले असता त्यांचा भाऊ, आरोपी धनराज भोयर, घरी उपस्थित होता आणि दारू प्याला होता. निलेश हे जेवण करण्यासाठी गेले असता त्यांना काहीही जेवण दिसले नाही. त्यामुळे त्यांनी आरोपीला विचारले की, “तू सर्व जेवण संपवून टाकले, माझ्यासाठी काही ठेवले नाही आणि स्वयंपाकसुद्धा केला नाही,” असे म्हटल्यावर आरोपीने शिवीगाळ केली आणि घरात ठेवलेली कुर्हाड उचलून मारण्यास गेला. त्यावेळी फिर्यादी निलेश यांनी ती पकडली, ज्यामुळे त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी निलेश भोयर यांच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी धनराज मनोहर भोयर (वय 30, रा. भापकी) यांच्याविरुद्ध कलम 118, 1, 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.




