मंत्रालयातील 40 कक्ष अधिकार्‍यांची तपोवन संस्थेला 55 हजारांची देणगी

संस्था डॉ. सुभाष गवई यांनी दिली माहिती : संस्थेच्या कार्याने अधिकारी वर्ग प्रभावित

अमरावती /29 मे: डॉ. पंजाबराव देशमुख प्रशिक्षण प्रबोधनी मध्ये पदोन्नती प्रशिक्षणासाठी आलेल्या मुंबई मंत्रालयातील विविध विभागातील 40 कक्ष अधिकार्‍यांनी तपोवन संस्थेचा अभ्यास दौरा करीत संस्थेच्या विकासाकरिता 55 हजार रुपयांची देणगी प्रदान केली.
डॉ. पंजाबराव देशमुख प्रबोधनी मध्ये महाराष्ट्रभरातून येणारे शासकीय अधिकार्‍यांचे प्रशिक्षण आयोजन होत असते. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाच्या संस्थांच्या कार्याचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येत असतो. प्रबोधिनीचे संचालक तथा अतिरिक्त आयुक्त अजय लहाने यांच्या मार्गदर्शनात प्रबोधनीचे प्राध्यापक या दौर्‍याचे आयोजन करीत असतात. यावेळी मुंबई मंत्रालयातील 40 कक्ष अधिकार्‍यांचे प्रशिक्षण सुरू असून नुकताच 40 कक्ष अधिकार्‍यांनी पद्मश्री डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजी साहेब पटवर्धन यांच्या विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन संस्थेला भेट दिली.
तपोवन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांचेकडून संपूर्ण तपोवन च्या कार्याची दाजी साहेबांच्या कार्यपद्धतीची माहिती कक्ष अधिकार्‍यांनी जाणून घेतली. त्यांना तपोवन मागील 76 वर्षात मानवता रुजविण्याचा जो प्रवास करीत आहे त्याबाबत तपोवन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी सविस्तरपणे माहिती दिली. प्रास्ताविक संचलन संस्थेचे उपअधीक्षक योगेश करडे यांनी केले तर आभार सचिव सहदेव गोळे यांनी मानले. यावेळी प्रबोधनी तर्फे दिपाली मरोड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रबोधिनी तर्फे प्रा. विनोद आढावू नीलिमा काळे संस्थेचे नियमक समिती सदस्य भीमराव ठाकरे अंतर्गत व्यवस्थापक निवृत्ती वेलकर भास्कर शेटये आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या भेटी दरम्यान कक्ष अधिकारी यांनी तपोवन मधील निर्मिती वस्तूची खरेदी करीत संस्थेच्या विकासाला हातभार म्हणून 55 हजार रुपयांची देणगी प्रदान केली.

संबंधित बातम्या

Back to top button