विवेक गुल्हाने यांची अमरावती कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

नितीन सराफ सचिव तर मिलिंद पाटील कोषाध्यक्ष पदी

-कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ नागपूर यांच्या वतीने कार्यकारिणी जाहीर
अमरावती /29 मे: अँमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया संलग्नित कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ, नागपूरच्या वतीने अमरावती महानगरातील कबड्डी असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत भाजप नेते तथा स्व. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष विवेक गुल्हाने यांची अमरावती महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.असो.चे सचिव प्रदीपसिंह ठाकूर यांनी ही निवड केली आहे.
अमरावती महानगर कार्यकारणी मध्ये नितीन सराफ यांची सचिवपदी, मिलींद पाटील यांची कोषाध्यक्षपदी, तर संदीप इंगोले यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड विदर्भ संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्वसहमतीने करण्यात आली.
या निवडीमुळे अमरावतीतील कबड्डी संघटनांना अधिक बळकटी मिळेल, असे मत कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले आहे. नवीन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली अमरावतीतून कबड्डीच्या लोकप्रियतेला नवे आयाम मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत असून नवनियुक्त अध्यक्ष विवेक गुल्हाने तसेच महानगर कार्यकारिणीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button