बडनेरा पोलिस स्टेशनमध्ये कायदेविषयक जागरूकता कार्यक्रम

अमरावती /29 मे: बडनेरा पोलिस स्टेशन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सोमवार, दि. 26 मे 2025 रोजी एलजीबीटीक्यूआयए समुदाय सदस्यांच्या संबंधात विशेष कायदेविषयक जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रफुल गीते अध्यक्षस्थानी होते. यावेळी एपीआय सोनाली मेश्राम यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्य अधिवक्ता अॅड. अमित सहारकर यांनी तृतीयपंथीसाठी असणारे कायदे आणि तरतुदीविषयी मार्गदर्शन केले. श्री. गीते यांनी प्रास्ताविक केले. विधी स्वयंसेवक निकिता चौहान यांनी सूत्रसंचालन केले, विधी स्वयंसेवक साक्षी महल्ले यांनी आभार मानले.




