अक्षय सरोदे महाराष्ट्र सन्मान भुषण पुरस्काराने सन्मानित

अमरावती /28 मे: तरुण तडफदार जयहींद लोक चळवळ चे अमरावती प्रभारी व समाजीक कार्यकर्ते अक्षय सरोदे यांना युवा महाराष्ट्र फाउंडेशन पूणे च्या विद्यमाने महाराष्ट्र सन्मान भुषण पुरस्कार 2025 करिता सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांची निवड करण्यात येऊन देवमाणुस ,बाप माणूस व अप्पी आमची कलेक्टर अशा विविध मालिके मध्ये अभिनय करत असलेल्या अभिनेत्री सौ पुष्पाजी शिंदे यांच्या हस्ते पुणे येथे नुकतेच पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
महाराष्ट्र फाउंडेशन पुणे यांचा सामाजिक क्षेत्रातील लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे दरवर्षी विविध पुरस्कारांचे आयोजन करण्यात येते यामध्ये पत्रकारिता , शिक्षण , साहित्य , सामाजिक क्षेत्र , राजकीय , सौंदर्य, डॉक्टर, वकील , महिला , सहकार , पतसंस्था , कला , क्रीडा इत्यादी क्षेत्रात कर्तुत्व घडवणार्‍या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते . यामध्ये अमरावती येथील जयहींद लोक चळवळ चे अमरावती प्रभारी अक्षय सरोदे यांची निवड सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल पत्रकार भवन पुणे येथे महाराष्ट्र सन्मान भूषण पुरस्कार अभिनेत्री पुष्पाजी शिंदे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

संबंधित बातम्या

Back to top button