पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

अमरावती /25 सटेंबर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शुक्रवार, दि. 26 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे. दौर्यानुसार, सकाळी 11:30 वाजता पी. आर. पोटे पाटील शैक्षणिक संकुलात अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात आढावा बैठकीला उपस्थित राहतील. रूख्मिनीनगर येथे दुपारी 2:30 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता महापालिका सभागृहात अमरावती महापालिकेच्या बैठकीस उपस्थित राहतील, तर दुपारी 4:30 वाजता अमरावती जिल्हा परिषद सभागृहातील बैठकीस उपस्थित राहतील. बैठकीनंतर गांधी चौकातील तुळजाभवानी दुर्गा उत्सव मंडळास सायंकाळी 6:30 वाजता, आणि हमालपुरा येथील तानाजी नवदुर्गा उत्सव मंडळास सायंकाळी 7 वाजता भेट देतील. त्यानंतर सायंकाळी 7:30 वाजता ते नागपूरकडे प्रयाण करतील.




