युवकाची गळफास घेवुन आत्महत्या

राजुरा बाजार येथील घटना

वरुड । 25 सप्टेंबर -येथून जवळच असलेल्या राजुरा बाजार येथील 22 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. नितेश नारायण माटे (22) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो मूळचा तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवासी आहे. तो गेल्या काही दिवसांपासून त्याचे राजुरा बाजार येथील रहिवासी असलेले मामा बबनराव दापुरकर यांच्या घरी राहत होता. काल रात्रीच्या सुमारास नितेशने त्याच घरात जेवण केले आणि सर्वजण झोपण्यासाठी आपापल्या स्थळी गेले. आज सकाळच्या सुमारास जेव्हा कुटुंबातील सदस्य झोपेतून जागे झाले तेव्हा घरीच नितेशचा मृतदेह फाशी घेतलेल्या स्थितीत आढळून आला. नितेशने फाशी का घेतली, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. यासंदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला. शवविच्छेदनानंतर आज दुपारच्या सुमारास नितेशच्या पार्थिवावर राजुरा बाजार येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वरुड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button