एकवीरा देवीला 10 तोळ्याचा हार अर्पण

देवीच्या दागिन्यांमध्ये वाढ

* 2.50 लाखांवर भाविकांनी घेतले दर्शन

अमरावती /24 सप्टेंबर – विदर्भातील कुलस्वामिनी अंबामाई व एकवीरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढती असून तिसर्‍या दिवशीही दर्शनासाठी लांबचलांब रांगा लागल्या आहेत. संस्थेने यावर्षी भाविकांकडून एकवीरा देवीला अर्पण केलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये वाढ होत असून भाविकाने बुधवारी देवीला 10 तोळ्यांचा हार अर्पण केला. त्याचप्रमाणे काही भाविकांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचे दान दिल्याचे वृत्त आहे. हे उल्लेखनिय आहे की, तीन दिवसांत अडीच लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. देवीच्या दर्शनासाठी बाहेर गावांमधून हजारो भाविकांसाठी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. तिसर्‍या दिवशीही सुरू असलेल्या या मोफत भोजनाचा 3,500 भाविकांनी लाभ घेतला. शेकडो सेवाधारी या सर्व व्यवस्थेचे निरीक्षण करीत आहेत. सीए योगेश राठी हे संस्थेच्या पदाधिकार्‍यांसह व्यवस्थेचे नियोजन करत आहेत. राठी आणि त्यांचे सहकारी पहाटेपासूनच महाप्रसाद तयार करण्यासाठी मेहनत घेत आहेत. त्याचप्रमाणे, 100 हून अधिक सेवाधारी इतर कामांमध्ये मदत करीत आहेत. शारदीय नवरात्रोत्सव सुरक्षा व्यवस्थेसह साजरा केला जात आहे. दोन्ही देवींचे दर्शन सकाळी 5 ते मध्यरात्रीपर्यंत उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या

Back to top button