माहेश्वरी वरिष्ठ नागरिक सभेचे अध्यक्ष ओमप्रकाश नावंदर यांचा सत्कार

अमरावती /28 मे: शहरातील शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत प्रसिद्ध नावंदर परिवारातील ओमप्रकाश नावंदर यांचे नुकताच माहेश्वरी वरिष्ठ नागरिक सभेचे अध्यक्षपदी समारंभ पूर्वक नियुक्ती करण्यात आले. पदभार सांभाळताना आपल्या स्वभावानुसार त्यांनी पदभार मी निष्ठा इमानदारी व आधीच्या वरिष्ठांकडून व आताच्या येणार्या सूचनांचे पालन मार्गदर्शन घेत संस्थेला जास्तीत जास्त उंचीवर नेण्याचा प्रयत्न करील असे सांगितले.
डॉ. गोविंद कासट मित्र मंडळ सदैव सहकार्य मार्गदर्शन आशीर्वाद त्यांचे लाभतात. नुकत्याच विनोद कलंत्री यांच्या निवासस्थानी कॅट संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्षा यांच्या जन्मदिवस औचित्य साधून डॉ. गोविंद कासट यानी सुचवलेल्या होतकरू भगिनीला शिलाई मशीन प्रदान प्रसंगी डॉ. गोविंद कासट यांनी ओमप्रकाश नावंदर यांच्या नियुक्ती बद्दल शाल व पुष्प प्रदान करून त्यांचा सत्कार केला. यावेळी श्याम शर्मा, विनोद कलंत्री संजय अग्रवाल रोहित लाहोटी, गोपाल पांडे आत्माराम पूरसवाणी रोहन कलंत्री उमेश वैद्य रोहित खर्चान रमेश नाटे इत्यादी मंडळी हजर होती.