‘अमरावती मंडल’ च्या गणेशोत्सवात पोकळे व कडू दांपत्याची आरती

दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना

-आकर्षक रोषणाई व सजावटीने सजला उत्सवमहाल
-मान्यवरांच्या उपस्थितीत तीन दशकांची परंपरा उत्साहात
-अग्रवाल बंधूंकडून पाहुण्यांचा सन्मान
अमरावती / 2 सप्टेंबर : पश्चिम विदर्भातील अग्रगण्य हिंदी दैनिक ‘अमरावती मंडल’च्या खापर्डे बगीचा परिसरातील मुख्य कार्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या श्रद्धाभावाने व उत्साहात सुरू झाला आहे. या वेळी कार्यालयात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या स्वरुपात आकर्षक मूर्ती स्थापित करण्यात आली असून सकाळ-संध्याकाळ विधीपूर्वक आरती व पूजन सुरू आहे.
सोमवारी संध्याकाळची आरती अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे तसेच प्रसिद्ध फिजिशियन डॉ. प्रफुल कडू व डॉ. सारिका कडू यांच्या हस्ते संपन्न झाली. याप्रसंगी दैनिक अमरावती मंडलचे प्रबंध संपादक अनिल अग्रवाल व प्रबंध संचालक राजेश अग्रवाल यांनी पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच कार्यालयात तीन दशके अखंड सुरू असलेल्या गणेशोत्सव परंपरेची माहितीही त्यांना दिली. ही परंपरा ऐकून मान्यवर अत्यंत प्रभावित झाले.
यानंतर एसआयजी पोकळे व डॉ. कडू दांपत्य यांनी अग्रवाल बंधूंशी विविध विषयांवर चर्चा केली. ‘अमरावती मंडल’च्या तीन दशकीय वाटचालीचा गौरवशाली प्रवास, उपलब्धिपूर्ण पत्रकारिता याबाबत माहिती जाणून घेत त्यांनी संपादक व व्यवस्थापनाचे अभिनंदन केले. यावेळी सँड अँड स्टोनचे संचालक ऋषी अग्रवाल, प्रणय अग्रवाल, गिरीश जालान यांच्यासह अमरावती मंडल परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button