वर्मा ज्वेलर्स चोरी प्रकरणात दोन्ही आरोपी महिलांना अटक

नाशिकमधून घेतले ताब्यात, चोरीचे दागीणे जप्त

अमरावती / 22 ऑगस्ट : रायली प्लॉट येथील बजरंगलाल छोटेलाल वर्मा ज्वेलर्स मधये 18 ऑगस्ट रोजी दोन अज्ञात बुरखाधारी महिलांनी चोरी केली होती. ग्राहक बनून आलेल्या या महिलांनी सोने पाहण्याच्या बहाण्याने 55.700 ग्रॅम वजनाचे, 5 लाख 50 हजार रुपयांचे दोन सोन्याचे कंगन हातात घेवून चपळाईने आपल्या कपड्यात लपवले आणि दुकानातून निघून गेल्या होत्या. दुकानातील सेल्स गर्ल्सनी लगेच गिनती केली असता कंगन गायब असल्याचे लक्षात आले. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहून समजले की, दोघींमध्ये एकाने दोन्ही सेल्स गर्ल्सच्या नजर चुकवून चोरी केली.
वर्मा यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. काही तासांतच तंत्रज्ञानाचा वापर करून त्या महिलांचा माग घेण्यात आला आणि 48 तासांच्या आत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले दोन्ही कंगन देखील जप्त करण्यात आले. या यशस्वी कारवाईसाठी पुलिस आयुक्त अरविंद चावरिया, पुलिस उपायुक्त श्याम घुगे, आणि सिटी कोतवालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कोटनाके यांचे मार्गदर्शन होते. तपास पथकामध्ये पीएसआय तुषार गावंडे, रंगराव जाधव, पोहेकां हरिश बुंदेले, इतर पोलिस कर्मचारी कार्यरत होते.

संबंधित बातम्या

Back to top button