रायली प्लॉटमधील काफिला हुक्का पार्लरवर छापा
10 जणांना घेतले ताब्यात

* एम.डी., गांजा, विदेशी दारूसह 2 लाख 87 हजाराचा ऐवज जप्त
*शहर गुन्हे शाखा युनीट 2 ची कारवाई
अमरावती /10 ऑगस्ट : शहर गुन्हेशाखा युनिट क्र.2 कडुन शहरात चालणार्या अवैध हुक्का पार्लर वर धाड टाकून एम.डी.,गांजा, विदेशी मद्य, हुक्का सेवनाचे साहित्य व इतर असा एकूण 2,87,475/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांनी गुन्हे शाखेतील पथकाची विशेष बैठक घेवुन शहरात चालणार्या अवैधधंदया विरोधात प्रभावी मोहिम राबवीण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार संदिप चव्हाण, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट क्र.2 यांचे नेतृत्वात पथकाने दि.09/08/2025 रोजी गुन्हेशाखा युनिट क्र.2 चे सहायक पोलीस निरीक्षीक महेश इंगोले, यांना गुप्त माहितीच्या आधारे रायली प्लाट येथे सतीधाम मंदीरा जवळ राहणारा प्रर्मेन्द्र शर्मा हा आपले राहते घराचे टेरेसवर रूममध्ये अवैधरित्या काफिला नावाचा हुक्का पार्लर चालवत असल्याचे समजले. या आधारे धाड टाकली असता महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थाचे वेगवेगळे फ्लेवरचे उपयोग करून हुक्का पार्लर चालवित आहे असल्याचे निदर्शनास आले. तसेच अवैधरित्या विदेशी दारूची विक्री करून ग्राहकांना तेथेच दारू पिण्याची व्यवस्था करून अवैधरित्या दारूचा गुत्था चालवित असल्याचे याची खात्री करून पो. स्टे सिटी कोतवाली हद्दीतील रायली प्लॉट येथिल प्रमेन्द्र ओमप्रकाश शर्मा वय 55 वर्ष रा.रायली प्लाट अमरावती यांचे घरात प्रवेश करून पायर्याने वरील छतावर (टेरेसवर) जावुन पाहीले असता छतावर (टेरेसवर) असलेली एक टिनाच्या रूमध्ये काही लोक बसुन हुक्काचे सेवन करतांना दिसले. तसेच सदर खोलीमध्ये हुक्का पॉट, तंबाखुजन्य सुंगधीत फ्लेवरचे डब्बे, हुक्का पिण्याचे उपयोगात येणारी नळी, शेगळी, तसेच विदेशी दारू इत्यादी दिसुन आले. तेथे हुक्का पिणारे व हुक्का पार्लर चालविणारे लोकांना जागीच पकडले असता सदर मिळुन आलेले इसमापैकी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असणार्या एक इसमाकडून एम.डी. (मॅफेडॉन) नावाचा अंमली पदार् मिळुन आल्याने एन.डी.पी.एस. कायदयातील तरतुदी प्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात आली. तसेच प्रमेन्द्र ओमप्रकाश शर्मा, पंकज जितेंद्र शर्मा, प्रणय प्रमेंद शर्मा व त्यांचे घरातील महीला यांनी पोलीसां सोबत हुज्जतबाजी करून हुक्का व मद्य, अंमली पदार्थाचा सेवन करणारे लोकासह पोलीसांचे अंगावर येवुन झोंबाझोंबी केली. सदर आरोपींनी हुक्का पिण्याकरीता आलेल्या 5 ते 6 ग्राहकांना पळवुन लावले व त्यासाठी जाणीवपूर्वक पोलीस पथकाचा रस्ता अडवुन त्यांना धक्काबुकी करून सरकारी कामात अडथळा निर्माण करून पोलीस पथकाला त्यांचे शासकिय कर्तव्य बजावण्यापासुन परावृत केले. हुक्का पार्लर चालविणारे व हुक्का पिणारे आरोपी नामे प्रमेन्द्र ओमप्रकाश शर्मा वय 55 वर्ष रा.रायली प्लाट अमरावती, पंकज जितेंद्र शर्मा वय 29 वर्ष रा. रायली प्लाट अमरावती, प्रणय प्रर्मेंद्र शर्मा वय 27 वर्ष रा.रायली प्लाट अमरावती, रमन पंडीत वानखडे वय 30 वर्ष रा. वटफळी, ता. नेर जि. यवतमाळ, तुषार मोतीराम मनोजा वय 21 वर्ष रा. रामपुरी कॅम्प गल्ली नबंर , अमरावती,आमीर हुसेन अशपाक हुसेन वय 24 वर्ष रा. कॅम्प कॉर्नर रोड, चपराशीपुरा, अमरावती ह. मु. धर्मकाट अपनी बेकरी जवळ अमरावती, यश सुधिर साखरे वय 27 वर्ष रा. कॉग्रेस नगर, बगीचा जवळ अमरावती, राहुल अमरलाल ईसरानी वय 24 वर्ष रा.जयराम नगर, राजापेठ, अमरावती, वैभव राजेश जाधव वय 27 वर्ष रा. अंबागेट अमरावती, अजय बाळकृष्ण माहुले वय 35 वर्ष रा. जुना सातुर्णा हनुमान मंदीर जवळ अमरावती व एक विधीसंर्घषीत बालकासह 10 जणांना ताब्यात घेतले. त्यांचे ताब्यातुन 25 ग्राम गांजा, तसेच 03 ग्राम एम.डी. (मॅफेडॉन) हा अंमली पदार्थ व हुक्का पार्लर मधील हुक्का सेवनाचे साहित्य, नगदी, व विदेशी दारू, व मोबाईल असा एकुण 2,87,475/- रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींविरूध्द पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे अपराध क्रमांक 279/2025 कलम 8 (क), 20 (ब) ळळ (अ), 21 (ब), 29 एन.डी.पी.एस. अॅक्ट सहकलम 132, 273, 296, 3 (5) भा.न्या.सं. सहकलम 4, 5, 6 सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने (जाहीराती प्रतिबंध आणि व्यापार आणि वाणिज्य, उत्पादन पुरवठा आणि वितरणाचे नियमण) अधिनियम 2003 सहकलम 65 (ई) मदाका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये कोणीही अवैधरीत्या हुक्का सेवनास जागा उपलब्ध करून देईल अथवा बेकायदेशिर हुक्का पार्लर चालवेल, दारूचा गुथ्ता चालवेल, अशा लोकांविरूध्द यापुढेही याच प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल. सर्व नागरीकांनी अमरावती शहर आयुक्तालय हद्दीत कोणीही बेकायदेशिर हुक्का पार्लर चालवित असल्यास त्याबाबत पोलीसांना तात्काळ माहीती द्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा गुन्हे श्री रमेश धुमाळ, शिवाजी बचाटे, सपोआ गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट क. 2 चे पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि अमोल कडू, सपोनि महेश इंगोले, पोउपनि संजय वानखडे, पोलीस अंमलदार-महेंद्र येवतीकर, अजय मिश्रा, दिपक सुंदरकर, सुनिल लासुरकर, गजानन ठेवले, मनोज ठोसर, आस्तीक देशमुख, जहीरोद्दीन, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, अतुल संभे, नईम बेग, विशाल वाकपांजर, राहुल देंगेकर, योगेश पवार, राजीक रायलीवाले, सागर ठाकरे, चेतन कराळे, संदीप खंडारे, चेतन शर्मा, राहुल दुधे, महिला पोलीस अंमलदार वर्षा घोगडे यांनी केली आहे.




