16 वर्षीय मुलीला पळवून नेऊन अत्याचार

चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

*पोलीसांनी आरोपीला शिताफीने केली अटक
*आरोपीची जेलमध्ये रवानगी

चांदूर रेल्वे /7 ऑगस्ट – 16 वर्ष 9 महीने वय असलेल्या एका मुलीला फुल लावून पळवून नेल्याची घटना 31 जुलै रोजी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. सदर मुलीवर बाहेरगावी नेऊन अत्याचार सुध्दा केल्याचा प्रकार घडला असुन याप्रकरणी एका आरोपीला 6 ऑगस्ट रोजी चांदूर रेल्वे पोलीसांनी अटक केली. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी वय 16 वर्ष 9 महीने हिला 31 जुलै रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लाउन पळवुन नेल्याची तक्रार चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला 3 ऑगस्ट रोजी देण्यात आली होती. यावरून पोलीसांनी अज्ञात आरोपीविरूध्द 3 ऑगस्ट रोजी बीएनएस कलम 137 (2) अन्वये गुन्हा दाखल करून चांदूर रेल्वे पोलीसांनी तपास सुरू केला आहे. घटनेचे गांभीर्य पाहता ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय विना पंडे, पीएसआय नंदलाल लिंगोट, कर्मचारी प्रशांत ढोके हे पथक मुलीचा शोध घेत असतांना सदर मुलगी व आरोपी युवक 6 ऑगस्टला मिळून आले. दोघांनाही चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला आणून पिडीत मुलीचे बयाण घेतले असता आरोपी युवकाने एका ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचे सांगितले. पिडीतेच्या बयानावरून चांदूर रेल्वे पोलीसांनी आरोपी प्रज्वल संतोष वाघमारे (वय 22, रा. रायपुरा, अचलपुर) याला अटक केली व सदर आरोपीविरूध्द बीएनएस कलम 64 (2) (आय), पोक्सो कलम 4 व 12 ही कलमवाढ केली. सदर आरोपीला गुरुवारी अमरावती येथील न्यायालयात हजर केले असता अमरावती न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावून जेलमध्ये रवानगी केली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button