एकवीरा देवी मंदिराचा प्रवेशद्वार निर्माणाचा मार्ग मोकळा

न्यायालयात महापालिकेला मोठे यश

अमरावती / 1 ऑगस्ट : राजापेठ येथील दीपार्चन मार्गावर सध्या उभारण्यात येत असलेल्या श्री एकवीरा देवी मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारास आता अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. एकीकडे स्थानिक भाविक आणि नागरिक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे न्यायालयात महापालिकेच्या बाजूने दिला गेलेला निर्णय हा शहरी सौंदर्यीकरणासाठी आणि धार्मिक श्रद्धेसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या प्रकरणात सुरेंद्र देशमुख यांनी प्रवेशद्वाराच्या उभारणीवर आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी मिळवलेले स्टेटस को आदेशामुळे काम थांबले होते. मात्र, आज वरिष्ठ न्यायाधीश गायकवाड यांच्या न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत कामाला परवानगी दिली. महापालिकेच्या वतीने तरुण वकील ऋषि छाबडा यांनी प्रभावी बाजू मांडली. त्यांनी कोर्टात सांगितले की, प्रवेशद्वाराची उभारणी शहरी विकास मंत्रालयाच्या विशेष निधीतून 45 लाखांच्या अनुदानावर सुरू आहे. हे संपूर्ण काम कायदेशीर असून, स्थानिक श्रद्धाळूंमध्ये याचे धार्मिक महत्त्व मोठे आहे.
श्री एकवीरा देवी हे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देवीच्या मंदिराला शोभा मिळावी, आणि भाविकांना एक आध्यात्मिक वातावरण मिळावे या हेतूने हा प्रवेशद्वार उभारण्यात येत आहे. स्थानिक नागरिक आणि धार्मिक संस्था अनेक दिवसांपासून या मागणीसाठी प्रयत्नशील होत्या. हा प्रवेशद्वार केवळ एक स्थापत्यिक रचना नसून, तो शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीचा भाग बनणार आहे. त्यामुळे त्याच्या उभारणीस आलेली अडथळे दूर होणे हे शहराच्या दृष्टिकोनातूनही सकारात्मक पाऊल आहे. हे प्रवेशद्वार देशमुख यांच्या घरापासून 5 फूट अंतरावर आहे, कोणतीही अडथळा नाही. गेटचा पिलर केवळ 3 फूट; घराचा फ्रंट 100 फूट आहे, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button