पडताळणी पूर्ण! 40 लाख लाडक्या बहिणी अपात्र

मुंबई / 28 जुलै : मागील काही दिवसांपासून सुरु असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची प्रत्येक निकषांनुसार पडताळणी पूर्ण झाली आहे. यात आतापर्यंत 40 लाख 28 हजार महिला अपात्र ठरल्या आहेत. या अपात्र लाभार्थ्यांनी मागील आतापर्यंत सरकारला आतापर्यंत हजारो कोटी रुपयांचा चुना लावला आहे. ही रक्कम 7 हजार कोटी रुपयांच्या घरात असावी, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी 1 जुलै 2024 पासून सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली आहे. सुरुवातीला अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आले. पण निवडणुकीच्या धामधुमीत सरकारने याकडे दुर्लक्ष करत सरसकट सर्वांनाच लाभ दिला. पण निवडणूक संपताच अर्जदारांची पडताळणी मोहीम सुरु केली. मागील पाच महिन्यांत लाभार्थीची पडताळणी करून अपात्र लाभार्थीचा शोध घेण्यात आला. यात आतापर्यंत 40 लाख 28 हजार महिला अपात्र ठरल्या आहेत.
14 हजार 298 पुरुष लाभार्थी, 2 हजार 289 सरकारी नोकरदार महिला, 2 लाख 32 हजार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला, 1 लाख 10 हजार 65 वर्षांवरील महिला, 4 लाख एका कुटुंबातील महिला, सव्वादोन लाख चारचाकी वाहन असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेत होत्या. या सर्वांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. हे पडताळणीतून स्पष्ट झाले. याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे, त्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. आतापर्यंत 1 लाख 60 हजार महिलांनी स्वतःहून लाभ नाकारला.

संबंधित बातम्या

Back to top button