संजय रायमुलकर शिंदेसेनेच्या अमरावती निरीक्षकपदी
एकनाथ शिंदेंनी सोपविली जबाबदारी

-वर्धा, यवतमाळचेही काम पाहणार
अमरावती / 22 जुले : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे मेहकर मतदार संघाचे माजी आमदार संजय रायमुलकर यांची पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्याच्या पक्ष निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी रायमुलकर हे जिल्ह्यात पक्षाच्या संघटन बांधणीचे काम पाहणार आहेत. संजय रायमुलकर 1987 पासून शिवसेनेत विविध पदांवर कार्यरत आहेत.
2001 पर्यंत तालुका प्रमुख, नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि 2009 ते 2024 पर्यंत ते तीन वेळचे आमदार होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला असला तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात ते सक्रिय आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या निवडीबद्दल केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांचा शिवसेना कार्यालयात सत्कार केला.
येत्या गुरुवारी, 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अमरावती येथील शासकीय विश्रामगृहात पक्ष निरीक्षक संजय रायमुलकर, माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार जगदीश गुप्ता, माजी आमदार श्रीकांत देशपांडे या वरिष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, सर्व तालुका प्रमुख, शहर प्रमुख आदी पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून सर्व पदाधिकार्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




