नराधम पित्याकडून 14 वर्षीय मुलीसोबत दुष्कर्म

जिवे मारण्याची धमकीही दिली

-परतवाडा येथील खळबळजनक घटना
अमरावती / 22 जुलै : नराधम बापाने आपल्या 14 वर्ष वयाच्या सख्ख्या मुलीसोबत जबरदस्तीने दुष्कर्म करण्यात आल्याची खळबळजनक घटना परतवाडा शहरातील कांडली परिसरात घडली. यावेळी त्याने घटनेबाबत वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही मुलीला दिली. मुलीच्या तक्रारीवरुन परतवाडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
नरेंद्रसिंह निकुम (40) असे या नराधम पित्याचे नाव आहे. नरेंद्रसिंह हा मुळचा मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या काही महिन्यांपासून कामाच्या निमित्ताने तो परतवाडा येथे कांडली परिसरात कुटुंबासह भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे. रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास नरेंदसिंह हा जेवणाच्या निमित्ताने आपल्या घरी आला. यावेळी त्याची 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती. तिने आपल्या पित्याला जेवण वाढून दिले आणि ती आपल्या खोलीत जावून अभ्यास करित होती. तेव्हा नरेंद्रही तिच्या मागे खोलीत शिरला आणि त्याने दार आतून लावून घेतले.
यावेळी नराधम नरेंद्रने आपल्या मुलीसोबत जबरदस्तीने अश्लिल कृत्य केले. आरडाओरड केली किंवा याबाबत कुणाजवळ वाच्यता केली तर जिवे मारण्याची धमकी त्याने मुलीला दिली. या प्रकारामुळे पिडित मुलगी चांगलीच हादरुन गेली होती. तरीही स्वत:ला सावरुन सोमवारी सायंकाळी तिने परतवाडा पोलिस स्टेशन गाठले आणि आपल्या पित्याविरोधात तक्रार नोंदविली. त्याआधारे पोलिसांनी आरोपी नरेंद्रसिंह निकुम याच्याविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button