शेतातील विहिरीत उडी घेउन युवकाने जीव दिला

धारणी तालुक्यातील घटना

धारणी / 21 जुलै : शेतातील विहीरीत उडी घेउन एका 35 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना धारणी तालुक्यातील चिखलपट या गावी घडली. दयाराम शिवलाल शेलुकर असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दयाराम शेलुकर शुक्रवारी दुपारी धारणीहून चिखलपट या आपल्या गावी घरी पाहोचला. त्यानंतर काही वेळाने तो शेतात पोहोचला. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारा दयारामने शेजारच्या शेतात असलेल्या विहिरीत अचानक उडी घेतली. तेथे दयारामची पत्नीही हजर होती. दयारामला बुडताना पाहुण तिने आरडाओरड करुन मदतीसाठी आजूबाजूच्या लोकांना पोहोचले. काही जणांनी दयारामला वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत दयाराम विहिरीतील खोल पाण्यात बूडाला होता.
याबाबत तात्काळ धारणी पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने दयारामचा मृतदेह विहीरीतून बाहेर काढला. दयारामने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण स्पष्ट होउ शकले नाही. धारणी पोलिसांनी अकस्मित मृत्युनी नोंद करुन तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button