टाटा एसची दुचाकीला धडक, युवकाचा मृत्यु
1 जण जखमी, दर्यापूर-अंजनगाव मार्गावर अपघात

दर्यापूर / 20 जुलै : टाटाएस वाहनाने समोरुन येणार्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक युवकाचा जागीच मृत्यु झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास दर्यापूर-अंजनगाव सुर्जी मार्गावर घडली आहे. आकाश संजय पारधी (23) असे मुतकचे नाव आहे. शुभम रमेश सारोळे (19) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
चांदुर बाजार तालुक्यातील करंजगाव येथील रहिवासी असलेले आकाश पारधी आणि शुभम सारोळे हे मित्र शुक्रवारी आपल्या एमएच 27 / डीके 0440 क्रमांकाच्या दुचाकीने काही कामानिमित्त दर्यापूरला आले होते. रात्री उशिरा काम आटोपून घरी परत जात असताना दर्यापूर-अंजनगावसुर्जी मुख्य रस्त्यावर लोणकर महाविद्यालयानजीक समोरून भरधाव आलेल्या एमएच 40 ईवाय 9675 क्रमांकाच्या टाटाएसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात आकाश पारधी याच्या याच्या अंगावरुन टाटाएस वाहनाचे चाक गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यु झाला. शुभम सरोळे यांला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर अमरावती येथे उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर शनिवारी दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात मृतक आकाशच्या नातेवाईकांनी धाव घेत मोठी गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर आकाशचा मुतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आकाश पारधी याच्या पश्चात वयोवृद्ध आई-वडील, दोन बहीणी असा आप्त परीवार आहे. या अपघातास कारणीभूत टाटाएस चालक विक्की देविदास माहुलकर (18, रा. बाभळी दर्यापूर) याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती ठाणेदार सुनील वानखडे यांनी दिली आहे.




