निम्न वर्धा प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले

प्रती सेकंद 26.65 घमी पाण्याचा विसर्ग

अमरावती / 17 जुलै : अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांच्या सिमेवर असलेल्या निम्न वर्धा प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढल्याने प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुुर करण्यात आला आहे. आज गुरुवारी, 17 जुलै रोजी दुपारी दोन वाजता प्रकल्पाचे तीन दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले. सध्या प्रकल्पातून 16.65 घनमीटर प्रती सेकंद या वेगाने पाणी सोडले जात आहे.
गेल्या काही दिवसांत प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाउस पडला. त्यामुळे पाण्याचा ओघ वाढून प्रकल्पाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणात पाणी संकलित होत आहे. जलाशयाची पाण्याची पातळी वाढल्याने तीन दरवाजे उघडून पाणी सोडण्याचा निर्णय आज दुपारी निम्न वर्धा प्रकल्पाच्या अभियंत्यांनी घेतला. मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात असल्याने नदीला पूर येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नदीकाठावरील गावांमध्ये राहणार्‍या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button